स्फूर्तिस्थान

डॉ.रामकृष्ण गोपाल भांडारकर हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर मध्ये सर्वात जुनी आणि नामांकित शैक्षणिक संस्था दर्जेदार शिक्षण देण्यासाठी एक १ एप्रिल १९१८ पासून आहे. सध्या ५ वी ते १२ वी पासून शिक्षण सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०१८ प्रशालेचे १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. " हाती घ्याल ते तडीस न्याल " या ब्रीदवाक्याप्रामाणे प्रशालेने सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे , आणि जग आपल्या कवेत सामावणारे लाखो अष्टपैलू विद्यार्थी घडविले आहेत.

कै.श्री.रामचंद्र गोपाळ देव.

कै.श्री.कृष्णाजी बल्लाळ डोंगरे.

कै.श्री.दामोदर सदाशिव करंबळेकर.

कै.श्री.रामकृष्ण भिकाजी उर्फ दामूआण्णा कुलकर्णी.

आमची माहिती

हरीभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय

संस्था :- शिक्षण प्रशासक मंडळी, पुणे
स्थापना ५ फेब्रुवारी १८८८ प्रेरणास्थान :- मा. कै. श्री.विष्णूशास्त्री चिपळूणकर
संस्थापक :-

  • १) मा.कै.श्री.रामचंद्र गोपाळ देव
  • २) मा.कै.श्री.रामकृष्ण भिकाजी उर्फ दामूआण्णा कुलकर्णी
    ३) मा.कै.श्री.दामोदर सदाशिव करंबळेकर
  • ४) मा.कै.श्री.कृष्णाजी बल्लाळ डोंगरे

पहिले अध्यक्ष :-

मा. डॉ. रामकृष्ण गोपाल भांडारकर हरीभाई देवकरण प्रशालेची स्थापना सोलापूर १ एप्रिल १९१८ रोजी झाली असून १ एप्रिल २०१८ ला १०० वर्षे पूर्ण होणार आहे.'हाती घ्याल ते तडीस न्याल' ह्या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रशालेने सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे, जग आपल्या कवेत सामावणारे लाखो अष्टपैलू विध्यार्थी घडविले आहेत.
                         श्री. गोविन्दश्री पंढरीनाथ शिदोरे यांच्या प्रयत्नातून सुप्रसिद्ध कादंबरीकार हरिनारायण आपटे व शिक्षण प्रशासक मंडळीचे सदस्य प्राचार्य विनायक रावजी आपटे यांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून सोलापूर येथे हायस्कूल सुरु करण्याचे निश्चित झाले. डोळे प्रशालेचे चालक मालक मा. कै. श्री. कृष्णाजी बल्लाळ आपटे यांनी काही अटींवर डोळे प्रशाला शि.प्र.मंडळीस सुपूर्त केली. सोलापूर येथील हरीभाई पेढीचे शेठ हिराचंद रामचंद्र गांधी यांनी २७,००१/- रुपयांची देणगी दिली यांच्या दातृत्वाने प्रशालेचे नामकरण हरीभाई देवकरण प्रशाला असे करण्यात आले.

Trational Day of Haribhai Prashala

Mr. A. G. Umbarje

आतापर्यंत अनेक यशस्वी विद्यार्थी घडवत आपली शाळा ९९ वर्ष कार्यरत आहे त्यामध्ये शाळेने अनेक नामवंत डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक, साहित्यिक, खेळाडू, समाज-सेवक, अनेकविध मान्यवर समाजाला दिले आहेत. अशाप्रकारे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवत आपली शाळा शताब्दी कडे वाटचाल करीत आहे. त्याचा आम्हा सर्वाना अभिमान वाटत आहे.

आपल्या सर्वांच्या विचाराने अजूनही शाळा समृद्ध करण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. चला तर पुढील वर्षी (२०१७-२०१८) शताब्दी साजरी करण्यास आपण सर्वजण सज्ज होऊ.

शाळेची ऐतिहासिक वास्तू व जागेविषयी माहिती :-

60% Complete
  • १) सरकार ने शाळेसाठी साडेचार एकर जागा दिली. यालगतची चार एकर पंधरा गुंठे जागा शाळेने नगरपालिकेकडून विकत घेतली.
  • २) पायासाठी चाचणी घेतली परंतु पायासाठी वर्णन केलेल्या जागेत खर्च खूपच येत होता.
  • ३) सध्या इमारत आहे ती जागा पुन्हा नगरपालिकेकडून विकत घेतली यावेळी नगरपालीकेने इमारतीच्या जागेपैकी एक एकर सत्तावीस गुंठे जागा संस्थेस देणगी म्हणून दिली.
  • ४) २२ मार्च १९२८ रोजी मि.एच.आर.गुल्ड (सोलापूरचे कलेक्टर) यांच्या शुभहस्ते पायाभरणीचा शुभारंभ केला.
  • ५) ३० डिसेंबर १९३१ रोजी शेठ हिराचंद गांधी यांच्या शुभहस्ते इमारतीची कोनशीला बसविण्याचा समारंभ झाला. याप्रसंगी शेठ हिराकाका यांनी पाच हजारांची देणगी दिली.
  • ६) पूर्णत्वास आलेल्या या वस्तूचे मुंबई इलारण्याचे गव्हर्नर सर फ्रेडरिक साइक्स यांच्या हस्ते शि. प्र. मंडळीच्या नियामक मंडळीचे त्यावेळचे अध्यक्ष दि.ब.का.रा. गोडबोले यांच्या उपस्थितीत हा समारोह संपन्न झाला.
  • ७) प्रशालेच्या इमारतीचे बांधकाम माजी विद्यार्थी पद्माकर आलंडकर यांनी केले आहे. इमारत उद्घाटन प्रसंगी त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.

कनिष्ठ महाविद्यालय :-

60% Complete

"कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात सन १९७५ पासून सुरु झाली. कला, वाणिज्य, विज्ञान, या तीनही शाखांची वर्ग भरविले जातात."

माजी मुख्याध्यापक