
एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी, हरिभाई देवकरण प्रशालेचा १०१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी, नियामक मंडळाचे सदस्य अॅड. दामोदर भंडारी, शाळा समितीचे अध्यक्ष श्री राजेश पटवर्धन, नियम मंडळाचे सदस्य पी.पी. कुलकर्णी, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. प्रशालेचे पर्यवेक्षक श्रीयुत कांगुणे सर यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.